वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या तिसऱया विश्व टेनिस चॅम्पियन्सशीप प्रदर्शनीय स्पर्धेत ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेने पुरूष एकेरीची अंतिम फेरी गाठली. मरेने उपांत्य सामन्यात स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला. आता अँडी मरे आणि रशियाचा रूबलेव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
ब्रिटनच्या माजी टॉप सीडेड मरेने या स्पर्धेतील एकेरीच्या उपांत्य सामन्यात राफेल नदालचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. दुसऱया उपांत्य सामन्यात रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 7-6 (7-5), 3-6, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान पटकाविले.