वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत नव्याने भाग घेणाऱया लखनौ प्रँचायझीने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला संघाचा मेंटर म्हणून नियुक्त केले. गौतम गंभीर हा भाजपचा विद्यमान खासदार आहे.
डॉ. गोयंका आणि आरपीएसजी उद्योग समुहाचे गौतम गंभीरने या नियुक्तीबद्दल आभार मानले आहे. 2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौचा संघ प्रथमच सहभागी होत आहे. 40 वर्षीय गौतम गंभीरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 58 कसोटी, 147 वनडे आणि 37 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मेंटरपदी नियुक्तीनंतर संजीव गोयंका यांनी गौतम गंभीरचे खास अभिनंदन केले आहे.