वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैनाला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या मेटेनी ऍरकोनाडा आणि स्पेनच्या बुस्काने अंकिता रैना आणि जर्मनीची मोना बार्थेल यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात ऍरकोनाडा आणि बुस्का यांनी अंकीता रैना आणि बार्थेल यांचा 4-6, 6-4, 10-8 असा पराभव केला. या स्पर्धेत अंकिता आणि बार्थेल यांना 57 डब्ल्यूटीए गुण आणि 1500 डॉलर्सचे बक्षीस मिळाले.