दोन वर्षांपासून करतेय तयारी
वरुण धवनची पुतणी अंजिनी देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शनकडून निर्माण होणाऱया चित्रपटाद्वारे अंजिनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. करणनेच वरुण धवनला स्वतःच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. अंजिनी सध्या वरुण धवनकडून अभिनयासाठी मार्गदर्शन घेत असल्याचे सांगण्यात येते.
अंजिनी दोन वर्षांपासून कठोर मेहनत करत आहे. ती नृत्य, एक्रोबेटिक्ससह अन्य कौशल्य शिकत आहे. स्वतःची भाषा सुधारण्यावरही तिचा भर आहे. तसेच काही जण तिला अभिनयाचे धडे देत असल्याचे तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
अंजिनी सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस छायाचित्रे शेअर केली आहेत. 20 वर्षीय अंजिनीच्या इन्स्टाग्रामवर 1 लाख 70 हजार फॉलोअर्स आहेत. श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, संजय कपूरची कन्या शनाया, सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम यांची ती मैत्रिण आहे.