चित्रपटगृहे सुरू झाली असली तरीही काही चित्रपट अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये रश्मि रॉकेट, उधम सिंह आणि आता विद्युत जामवालचा ‘सनक’ देखील सामील आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारने ‘सनक’ हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
अलिकडेच चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला होता. सनक चित्रपटात विद्युत जामवाल याच्यासह बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा, नेहा धूपिया आणि चंद न रॉय सान्याल दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसोबत निर्मात्यांनी एक नवे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये विद्युत एका हातात बाळ तर दुसऱया हातात बंदूक पकडून असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क शर्मा यांनी केले आहे. तर बंगाली अभिनेत्री रुक्मिणीचा हा बॉलिवूड डेब्यू असणार आहे. यापूर्वी विद्युत ‘खुदा हाफिज’ चित्रपटात दिसुन आला होता. हा चित्रपट देखील डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.