प्रतिनिधी / बेळगाव
अंजुमन ए इस्लाम बेळगावतर्फे मंगळवारी कोरोना योद्धय़ांचा सन्मान करण्यात आला. अंजुमन संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, डॉक्टर व कोरोना योद्धय़ांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. माजी आमदार फिरोझ सेठ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी अंजुमनचे अध्यक्ष राजू सेठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मौलाना सलीम म्हणाले, कोरोनामध्ये त्या काळी अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या. मृत्यू झाल्यानंतरही अंत्यविधी करण्यास कोणी उपलब्ध होत नव्हते. या काळात प्रत्येक कोरोना योद्धय़ाने उत्तम काम केले आहे. जीवाची पर्वा न करता समाजाचे हित पाहिले. यापुढेही असेच काम करण्याची प्रेरणा कोरोना योद्धय़ांकडून मिळत राहील. कोरोनाच्या काळात चांगले काम केलेल्या प्रत्येकाचे त्यांनी कौतुक केले.
फिरोज सेठ यांनी उपस्थितांचे आभार मानून केलेल्या कार्याचे कौतुक केले. बेळगाव परिसरातील मौलानांनी व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समीउल्ला माडीवाले, गफूर घीवाले, मौलाना साजीद, मुफ्ती मंजूरसाब, बेळगावमधील मुस्लीम बांधव, मौलाना व सर्व अंजूमन टीम उपस्थित होती.