सेन्सेक्स 134 तर निफ्टी 11.15 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ामधील अंतिम वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 134.03 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,845.82 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 11.15 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,504.95 वर बंद झाला आहे.
जागतिक बाजारामध्ये मिळत्याजुळत्या संकेतामुळे बँक आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागातील विक्रीमुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांमधील एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक 2.39 टक्क्मयांची घसरण राहिली आहे. तसेच कोटक बँक, बजाज फिनसर्क्ह, मारुती सुझुकी, टायटन, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि टाटा स्टील यांच्या समभागात घसरण राहिली आहे.
अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक 3.73 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एनटीपीसी, टेक महिंद्रा, सन फार्मा, पॉवरग्रिड कॉर्प आणि ओएनजीसीचे समभाग 2.72 टक्क्मयांनी वधारले आहेत.
संपूर्ण आठवडय़ाच्या दरम्यान सेन्सेक्स 8.73 अंकांनी खाली गेला आहे तर निफ्टी 40.50 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. भारतीय बेंचमार्कच्या निर्देशांकांनुसार दिवसभरात सर्वाधिक वेळ बाजार तेजी राहिल्यानंतर अंतिम क्षणी घसरुन बंद झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून प्रात्साहनात्मक उपाय सादर करण्यात अपयश आल्याने आणि काही देशातील कोरोनाचे वाढते संकट यामुळे शेअर बाजारातील व्यवहार प्रभावीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख क्षेत्रातील कामगिरी
बीएसईमधील वित्तीय कंपन्या, बँका, उत्पादन क्षेत्र, एफएमसीजी आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक 1.16 टक्क्मयांनी घसरला आहे. तर आरोग्य सेवा, दूरसंचार, रियल्टी, युटिलिटी, वीज आणि वाहन कंपन्यांतील निर्देशांक जवळपास 3.50 टक्क्मयांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.