प्रतिनिधी / सांगली
अंतिम वर्ष / अंतिम सत्र परीक्षेचे जे विद्यार्थी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेस बसले होते, अशा अंतिम वर्ष/अंतिम सत्रास प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेबाबत त्या त्या महाविद्यालयात सूचना लावण्यात आल्या आहेत.
उन्हाळी 2020 मधील अंतिम वर्ष/अंतिम सत्रास प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने ऑक्टोंबर, 2020 मध्ये विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या आहेत. सदर परीक्षेच्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कोविड-19 प्रादुर्भाव, गैरहजर अथवा तांत्रिक कारणामुळे परीक्षेस प्रविष्ठ होता आलेले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षा प्रारंभ तारखा उपरोक्त संदर्भ कं. 2 च्या परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच जे विद्यार्थी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा देवू शकलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर आयोजित करण्यात येतील असे उपरोक्त संदर्भ कं. 1 च्या परिपत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे. तसेच सद्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर करून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असल्याने विद्यार्थी हितास्तव अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा तातडीने आयोजित करण्यात येत आहेत. सबब, अंतिम वर्ष/अंतिम सत्रातील जे विद्यार्थी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेस बसले होते त्यांची परीक्षा बुधवार 16 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येत आहे. याची नोंद सर्व सबंधीतांनी घ्यावी. तसेच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक ऑन परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात येईल.