प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले वडखोल येथील सचिन भालचंद्र पालव या 32 वर्षीय अंध युवकाने गुरुवर्य गुरुदास मुंडये व ऋषीकेश देसाई यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हार्मोनियम विशारद पूर्ण या पदवी परिक्षेमध्ये 800 पैकी 618 गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
सचिन अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मुंबई या महाविद्यालयाच्या कुडाळ शाखेमधून हार्मोनियम विशारद ही परिक्षा उत्तीर्ण झाला. या परिक्षेमध्ये सचिनला लेखनिक म्हणून नितिन कुलकर्णी यांनी काम पाहीले. सचिनचे चारही विषयामध्ये विशारद होण्याचे स्वप्न आहे. डॉ. सुधाशु कुलकर्णी यांच्याकडे शिकण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे. पण सद्या आजारपणामुळे व घरच्या गरीब परिस्थितीमुळे ते त्याला शक्य नाही. सचिनने आपल्या अंधत्वावर मात करुन आपल्या आई वडीलांचे नांव मोठे केले आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.