प्रतिनिधी/ बेळगाव
अंनिस बेळगाव शाखेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी विद्यानिकेतन कॅम्प येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यान, प्रश्नोत्तरे तसेच पाच मिनिटांचे पथनाटय़ सादरीकरण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. ऍड. राम आपटे अध्यक्षस्थानी होते. कार्याध्यक्ष शंकर चौगुले, उपाध्यक्ष अशोक देशपांडे, तसेच प्रा. मयूर नागेनहट्टी, सतीश जुटेकर, सर्पमित्र आनंद चिट्टी आणि गीता नागेनहट्टी, प्रशांत पाटील, राहुल पाटील, छाया शिंदे, ममता बेळगावकर इत्यादींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
शिक्षक जी. एस. पाटील यांनी चमत्काराचे प्रयोग सादर केले. बालिका आदर्श, न्यू इंग्लिश स्कूल मुतगा, सरस्वती हायस्कूल हंदिगनूर या हायस्कूलमधील 30 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता. दर महिन्याला एक याप्रमाणे अशी शिबिरे कोरोना महामारीच्या संक्रमित काळात सर्वंकष खबरदारी घेऊन पार पाडण्याचा उद्देश असल्याचे बेळगाव अंनिसतर्फे कळविण्यात आले आहे. पुढील महिन्यात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आधारित कार्यशाळा घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी अंनिस कार्यालयात संपर्क साधावा.