प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य ग्रंथालयामध्ये गुरुवार दि. 15 रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. युवा वाचक यशराज रजपूत याने कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपले वडील ऋतुराज व बहीण तनिष्का यांच्यामुळे आपल्याला वाचनाची आवड लागल्याचे त्याने सांगितले.
डॉ. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने ग्रंथालयाने युवावर्गासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी अशोक याळगी, किशोर रेडकर, ग्रंथपाल रंजना कारेकर, प्रशांत कुट्रे, गुरुनाथ आदी उपस्थित होते.