दोन महिला, तीन पुरुष जागीच ठार, पाच जण गंभीर जखमी
सोलापूर / प्रतिनिधी
अक्कलकोट हून सोलापूरकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या जीपला कुंभारी नजीकच्या विडी घरकुल जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिला तीन पुरुष जागीच ठार झाले तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत इतर अन्य दहा प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
लक्ष्मण मुरलीधर शिंदे (वय 50, रा. बराणपुर ता अक्कलकोट) हे मयत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर गुरुराज बाबू वांझरे, निसार अमरद्दीन पिरजादे, अक्षय शिंदे अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे समजली आहेत. इतर मयत व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या अपघातामधील सर्व मुंबई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.