शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरांना पकडले : दोघांवर गुन्हा दाखल
तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्मयातील चंदनाच्या झाडांच्या चोरीचे सत्र सुरूच आहे. चपळगांव येथील संगमेश्वर सिध्दाराम खदे यांच्या शेतातील बांधावर चंदनाची झाडे दोन चोरटÎांनी कापून नेण्याच्या तयारीत असताना शेतकऱयाच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला आहे. विठ्ठल सिताराम पाटील व एक अनोळखी इसम ( दोघे रा. चपळगाव ) असे यातील आरोपीचे नांवे आहेत. या दोन्हीही आरोपींविरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
अशाप्रकारे करणारे चोरटे अंधाराचा फायदा घेत, चंदनाच्या झाडाला छिदे पाडून झाडाचा गाभा तपासून घेतात मगच झाड कापून घेऊन जातात. चंदन चोरटयांचा तालुक्मयात सुळसुळाट झाला आहे. असाच प्रकार तालुक्मयातील अनेक गावात घडला. चपळगांव येथील शेतकरी संगमेश्वर सिध्दाराम खदे यांच्या शेतातील बांधावर चंदनाची झाडे दोन चोरटयांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेण्याच्या तयारीत असताना चंदनाच्या झाडास दोन्ही आरोपींनी चंदनाचे झाडामध्ये चंदन आहे किंवा नाही हे गिरमिट मारुन खात्री करुन चोरी करण्याच्या उद्देशाने चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे आरोपी अद्याप अटक नाही. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज मियावाले हे करीत आहेत.