अक्कलकोट /प्रतिनिधी
अक्कलकोट शहर – तालुक्यात दि.११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरातील पुकाळे प्लॉट ०२, संजय नगर ०२, आझाद नगर ०१ ग्रामीण भागातील सलगर ०१, करजगी ०१ असे एकूण ७ कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.तसेच अक्कलकोट तालुक्याची एकूण रुग्ण संख्या आता १४७ वर पोहचली आहे.
एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या : ८५, एकूण बरे झालेले रुग्ण संख्या : ३५,एकूण उपचार घेत असलेले रुग्ण : ४३
एकूण मृत रुग्ण संख्या : ०७ ग्रामीण भागात एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या : ६२,एकूण बरे झालेले रुग्ण संख्या : ३१, एकूण उपचार घेत असलेले रुग्ण : २९, एकूण मृत रुग्ण संख्या : ०२. त्याचप्रमाणे मागील तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या स्वॅब पैकी ६८ स्वॅब तर शुक्रवारी घेतलेले ८१ स्वॅब पेंडिंग आहेत. असे एकूण आतापर्यंत १४९ स्वॅब पेंडिंग आहेत. आता त्या अहवालाची प्रतीक्षा आहे.