ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या मातोश्री अरुणा भाटिया यांचे अल्पशा आजाराने मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात आज सकाळी निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या.
अक्षय कुमारने इंन्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ती माझं सर्वस्व होती. तिच्या जाण्याने मला खुप दु:ख झाले. माझी आई अरुणा भाटियाने आज जग सोडले. तिच्या आत्म्याला शांती लाभो. कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो.’
दरम्यान, अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी युकेला होता. त्याच्या आईला मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याचे समजताच तो सोमवारी मुंबईत परतला. मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले होते.