दिनांक 03-04-2022
मेष
तब्येतीला विशेष करून जपावे लागेल. कुपथ्याचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी चुकीच्या माहितीमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या सल्यामुळे नुकसान होऊ शकते. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. पैशांच्या देवाण-घेवाणीमध्ये सावध राहावे. प्रेमीजनानी भावना समजून घ्याव्यात. अशोकाची तीन पाने जवळ ठेवावीत.
वृषभ
या आठवडय़ात बऱयाच कामांचा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. तुम्हाला असे वाटू शकते की कामाचा ताण वाढल्यामुळे एखादा ब्रेक घ्यावा. आवडत्या व्यक्तीबरोबर थोडा वेळ घालवावा. नात्यांमधली हरवलेली ऊब पुन्हा अनुभवावी. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. कुटुंबात थोडे हेवेदावे संभवतात. वैवाहिक जीवन सर्वसामान्य असेल. केळीच्या झाडाखालील माती जवळ ठेवावी.
मिथुन
अति शंकेमुळे किंवा गैरसमजुतीमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. या आठवडय़ात लोकांना समजून घेण्यामध्ये तुम्हाला अपयश येऊ शकते. यामुळे लोकांचे तुमच्याबद्दल असलेले गैरसमज वाढू शकतात. हा आठवडा संयमाने आणि समजुतीने वागण्याचा संदेश आहे. कामाच्या ठिकाणी वरि÷ांची मर्जी सांभाळा. एक वडाचे पान जवळ ठेवावे.
कर्क
तब्येतीच्या चढ-उतारामुळे त्रस्त व्हाल. एखादा अनपेक्षित आजार त्रास देऊ शकतो. परिवारातील सदस्यांना पुढे आपले म्हणणे मांडण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडू शकता. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. प्रेमीजनानी अनावश्यक बाबतींमध्ये मत व्यक्त करू नये. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करा.
टॅरो उपाय
आपली आत्मशक्ती आणि आकर्षणशक्ती वाढवण्याकरता स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक पोवळे टाकून सूर्यप्रकाशात सव्वा तास ठेवावे आणि मग ते पाणी प्यावे.
सिंह
या आठवडय़ात तुमचा स्वभाव थोडा हेकेखोर होण्याचा प्रसंग येईल. जवळच्या व्यक्तींशी न पटल्यामुळे मन उदास होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांचा पूर्ण सहयोग न मिळाल्यामुळे चिडचिड होऊ शकते. जुनी येणी वसूल करायचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात थोडा ताणतणाव असेल. मुंग्यांना साखर घाला.
कन्या
दूषित पाणी पिल्यामुळे किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात भरवशाच्या लोकांनी दगा दिल्यामुळे किंवा फसवणूक केल्यामुळे थोडीशी उदासी येऊ शकते. परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या आडमुठय़ा स्वभावाचा त्रास होईल. पैशाचे व्यवहार सांभाळून करावेत. गरजू व्यक्तीला अन्नदान करा.
तूळ
कार्यालयीन कामकाज वाढेल. तब्येतीचा त्रास कमी होईल. डोळय़ांचे विकार संभवतात. पैशाचे आगमन चांगले असेल. परिवारातील वातावरण पोषक असेल. जोडीदाराशी वाद घालणे टाळावे. प्रेमीजनांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा. कामाच्या ठिकाणी कोणाचीही मदत घेणे टाळावे. आपण बरे की आपले काम बरे असे वागणे ठेवावे. पक्ष्यांकरता पाण्याची सोय करावी.
वृश्चिक
या आठवडय़ात धनलाभाचे विशेष योग बनतील. निरर्थक गोष्टींकडे लक्ष न देता आलेल्या संधींचा फायदा कसा उचलता येईल हे पहावे. परिवारातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू शकते. कंबर किंवा पायाच्या दुखण्याने त्रस्त होऊ शकता. कर्ज वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गरजू व्यक्तीला औषधांचे दान करा
धनु
हा आठवडा थोडाफार मानसिक चिंतेचा असू शकतो. परिवारातील व्यक्तींमध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटेल आणि त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल. घरखर्चात वाढ झाल्याने ताळमेळ बसणार नाही. अनावश्यक खर्च टाळावा. प्रेमीजनांनी दूरवर जाणे टाळावे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल. सफेद हकीक जवळ ठेवावा.
मकर
तब्येतीच्या दृष्टीने हा आठवडा सर्वसामान्य असेल. परिवारातील एखाद्या मंगलकार्यामध्ये सहभागी व्हाल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मन आनंदी होईल. प्रेमीजनांना काळ अनुकूल आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. वैवाहिक जीवन समाधानकारक राहील. काळा रुमाल जवळ ठेवावा.
कुंभ
मेहनत जास्त आणि पैशांची आवक कमी अशा परिस्थितीमुळे मन त्रस्त होऊ शकते. अनेक अडचणी एकदम आल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. अशावेळी दुसऱयांकडून मदत घेण्यास संकोच बाळगू नका. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या व्यवहाराचा त्रास होऊ शकतो. चंदनाचा टिळा लावा.
मीन
अति बोलण्यामुळे किंवा न विचारता सल्ला दिल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तुमचे म्हणणे जरी योग्य असले तरी ते स्वीकारले न गेल्यामुळे मन उदास होऊ शकते. घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा विशेष प्रयत्न कराल. जबाबदाऱया योग्य रीतीने पार पाडल्यामुळे कौतुक होईल.
आजारी व्यक्तीला आर्थिक मदत करावी.