प्रतिनिधी/ बेळगाव
मागील सहा महिन्यांपासून बंद असणारे पासपोर्ट सेवा केंद्र सोमवारपासून पुन्हा कार्यरत झाले आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात नव्या जागेत हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या नागरीकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा कार्यालय कार्यरत झाल्यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून पासपोर्ट सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले होते. परंतु याचा फटका बेळगावमधील नागरीकांना बसत होता. त्यांना हुबळी येथे जावून पासपोर्ट काढावा लागत होता. त्यामुळे बेळगावमधील पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात वारंवार करण्यात येत होती. कार्यालयातील जागा अत्यंत कमी असल्यामुळे सामाजिक अंतर पाळणे शक्मय नव्हते. यासाठी पासपोर्ट मंत्रालयाकडून परवानगी मिळण्यास वेळ लागत होता.