ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वतः तटकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, काल माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.
दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 48 हजार 665 वर पोहचली आहे. मृतांचा एकूण आकडा 43 हजार 348 एवढा आहे. तर सद्य स्थितीत 1 लाख 34 हजार 137 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 14 लाख 70 हजार 660 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे