प्रतिनिधी / सांगली
कामवाटपावरून जिल्हा परिषदेत अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुड्डेवार आणि जिल्हापरिषद सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. कामांचे चुकीच्या पध्दतीने आणि नियमबाहय़ वाटप झाल्याने रद्द करावे, अशी मागणी तब्बल 24 जि.प. सदस्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तर मी काम वाटप समितीचा अध्यक्ष मी बघून घेतो असा इशारा गुड्डेवार यांनी दिला. दरम्यान, या वादावरून जिल्हा परिषदेमध्ये आगामी कालावधीत मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये नुतन अतिरिक्त सीईओ म्हणून शिस्तप्रिय म्हणून ओळख निर्माण केलेल्या चंद्रकांत गुड्डेवार यांची नुकतीची नियुक्ती झाली आहे. त्यांनी या जिल्हा परिषदेमध्येही गुड्डेवार पॅटर्न राबविण्यास सुरूवात केली आहे. पहिला दणका शिराळा येथील वसतिगृहाची तपासणी करून दिला. यानंतर त्यांनी जि.प. बांधकाम विभागाच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर सोसायटय़ांना काम वाटप करण्यात येते. यापूर्वी सदस्यांच्या शिफारशीनुसार वाटप होते मात्र अतिरिक्त सीईआंsनी शिफारस बंद करून जो प्रथम येईल त्याला काम असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. शुक्रवारी सुमारे सव्वादहा कोटीच्या कामाचे वाटप जिल्हा परिषदेमध्ये गुड्डेवार यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
या कामवाटपाला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी विरोध केला असून ही वाटप केलेली कामे तातडीने रद्द करावी अशा मागणीचे 24 सदस्यांच्या सहीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. काम वाटप चुकीच्या पध्दतीने आणि नियमबाहय़ करण्यात आली असून ती रद्द करावी असे निवेदनामध्ये म्हटले आहे. दरम्यान सदस्यांच्या या मागणीबाबत अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुड्डेवार म्हणाले, कामवाटप समितीचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे याचे काय करायचे ते मी बघून घेईन. कडक शिस्तीचे असलेल्या या अधिकाऱयांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त सीईओ गुड्डेवार आणि जिल्हा परिषद सदस्य आमने-सामने आले असून आगामी कालावधीत जिल्हा परिषदेत मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
…तर नोंदणी रद्द करणार
दरम्यान, गुड्डेवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जि.प. सभागृहामध्ये सुमारे दहा कोटीची कामे वाटप करण्यात आली. ज्या कामावर एकमत झाले नाही अशा ठिकाणी चिठ्ठी आणि ड्रॉ काढून कामांचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त सीईआंsनी ठेकेदारांना चांगलाच दम देताना निकृष्ट काम केल्यास, तसेच सब ठेकेदाराला काम दिल्यास नोंदणी रद्द करण्याची करण्याचा इशारा त्यांनी दिला. कामे चांगली करा, जेणेकरून जिल्हय़ाला आणखी निधी आणता येईल, कामांची मी स्वतः तपासणी करणार, निकृष्ट आढळून आल्यास गय केली जाणार नाही, असाही दम यावेळी त्यांनी दिला.