नवी दिल्ली
अदानी पॉवरने एस्सार पॉवरच्या मध्य प्रदेशमधील 1200 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पाचे अधिग्रहण नुकतेच पूर्ण केले असल्याचे समजते. कंपनीने यासंबंधीची माहिती काही दिवसांपूर्वी शेअर बाजाराला दिली आहे. एस्सार पॉवर एमपी लि.चे अधिग्रहण करण्यासाठी अदानी पॉवरने 4 हजार 250 कोटी रुपये मोजले असल्याचे सांगितले जाते. अदानी पॉवरने सदरच्या अधिग्रहणासाठी जून 2021 मध्ये बोली लावली होती.