वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्सीसी सुपर मेजर टोटल आणि अदानी समूहाची संयुक्त कंपनी भारतामध्ये पेट्रोल पंप उभारण्याची लवकरच मान्यता मिळवण्याची शक्मयता आहे. याच्यासाठी कंपनी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज दाखल करणार आहे. टोटल अदानी फ्यूल्स मार्केटिंग लिमिटेड किरकोळ विक्रीसाठी परवाना मिळवण्यासाठी लवकरच प्रस्ताव दाखल करणार असल्याचे अदानी गॅसचे सीईओ सुरेश मंगलानी यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत आम्ही सीएनजीवरच संपूर्ण लक्ष्य केंद्रीत केल्याचेही मंगलानी यांनी म्हटले आहे. परंतु आता भविष्यात इंधनाची किरकोळ विक्री करण्यात येणार आहे. आतापर्यंत गौतम अदानीची कंपनी पीएनजी आणि सीएनजी गॅस पुरवठा करत आहे. आता कंपनी पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाच्या किरकोळ व्यवसायात उतरण्याची शक्मयता आहे.
1500 पंप उभारण्याची योजना टोटलने देशातील अदानीसोबत आगामी 10 वर्षात जवळपास 1500 पेट्रोल पंप उभारण्याची योजना आखण्याची तयारी केली आहे. टोटल अदानी फ्यूल मार्केटिंग लिमिटेड अदानी गॅसची सहाय्यक कंपनी आहे. यात नॅचरल गॅस, पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक गॅस चार्जिंग सुविधा देणार आहे.