सरकारी सहाय्य नसल्याचा आरोप : कोविडचा सर्वाधिक प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड आणि त्यामध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील जवळपास बहुतांश स्टार्टअप्स मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 50 टक्के स्टार्टअप्स आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याची माहिती आहे.
यातील जवळपास एकूण स्टार्टअपमधील 38 टक्के स्टार्टअप निधीअभावीच असल्याची माहिती आहे. तसेच 12 टक्क्मयांकडे एक महिन्याइतका पुरेल इतकाच निधी आहे. दुसऱया बाजूला काही स्टार्टअप असे आहेत की त्यांचे मूल्य सर्वोच्च असल्याचे पहावयास मिळाले आहे. पेटीएमची सहयोगी कंपनी वन 97 कम्युनिकेशन 1.20 लाख कोटी रुपयांसोबत सर्वाधिक मूल्यवान स्टार्टअप असल्याची नोंद करण्यात आली आहे.
चार्टच्या माहितीनुसार 21 युनिकॉर्नमध्ये 8 स्टार्टअप भारतात असून त्यांचे मूल्य एक अब्ज डॉलर आहे. देशात यांची संख्या सर्वाधिक बेंगळूर येथे आहे. त्यापाठोपाठ दिल्ली, मुंबई, नोएडा, पुणे, गुडगांवमध्ये आहेत.
काही स्टार्टअपकडे अपुरा निधी
देशामधील जवळपास 30 टक्के स्टार्टअपकडे त्यांच्याजवळ एक ते तीन महिने पुरेल इतकाच निधी आहे तर 16 टक्के स्टार्टअपकडे 3 ते 6 महिने पुरेल इतकाच निधी उपलब्ध असून 4 टक्के स्टार्टअप पूर्णपणे बंद पडल्याची माहिती अहवालामधून देण्यात आली आहे.