वार्ताहर/ रामनगर
गोवा हद्दीतून कर्नाटकात येणाऱया वाहनांवर येथील अनमोड चेक नाक्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यात अनमोड अबकारी नाक्याच्या उपनिरीक्षका रेश्मा बानावलीकर यांनी पाच वाहने जप्त करून गोवा बनावटीचा दारूसाठाही जप्त केला आहे. तर बुधवार दि. 14 रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान गोवा येथून कर्नाटक हद्दीत येणाऱया टीएन 31 बीएस 9100 क्रमांकाच्या बोलेरो वाहनाची तपासणी करताना 260 लीटर गोवा मद्य आढळून आले आहे. याची किंमत 3,82,464 तर वाहन पाच लाख असा एकूण 8,82,464 इतका मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर वाहतूक प्रकरणी आरोपी शयमूर्ती गणेशन् तामिळनाडू, कृष्णराज नटराज तामिळनाडू यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर सदर कारवाई अनमोड अबकारी उपनिरीक्षिका रेश्मा बानावलीकर तसेच अबकारी अधिकाकरी एस. एन. खान व सदाशिव राठोड यांनी केली.