किरीट सोमय्या यांची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दापोली तालुक्यातील मुरूड येथे मंत्री अनिल परब यांच्याकडून बांधलेल्या रिसॉर्टमध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आह़े बनावट कागदत्रे तयार करून परब यांनी ही रिसॉर्ट आपल्या नावावर केली होत़ी भारत सरकारने आता ही रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परबांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी कराव़ी अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केल़ी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्यासंबंधी सोमय्या रत्नागिरी दौऱयावर आले होत़े यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी ब़ी एन पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहीतकुमार गर्ग यांची भेट घेतल़ी यानंतर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्य़ा अनिल परब यांना सरकारी यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी किरीट सोमय्या यांनी केल़ा
सोमय्या यांनी सांगितले की, दापोली येथील साई व सी कौंच रिसार्ट बांधण्यासाठी 2 मे 2017 रोजी विभास साठे यांच्याकडून परब यांनी जमीन खरेदी केली होत़ी यावेळी परब यांनी ग्रामपंचायतीकडून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल़ी याठिकाणी थ्री फेज वीज कनेक्शन देखील घेतले होत़े यानंतर 2021 मध्ये रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या नावावर करण्यात आले होत़े दरम्यानच्या काळात या जागेमध्ये सीआरझेडचे अवैध बांधकाम करण्यात आले असा आरोप सोमय्या यांनी केला आह़े
भारत सरकारने 31 जानेवारी 2022 रोजी पर्यावरण कायद्यानुसार रिसॉर्टचे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत़ अनिल परब यांच्या नावावर ही जमीन होती यासंबंधी आपल्याकउs पुरवे आहेत़ या काळात त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स, वीजबील आदी भरल्यासंबंधी आपल्याकडे पुरावे आहेत़ त्यामुळे बनावट कागदपत्रे, सत्तेचा दुरूपयोग, भ्रष्टाचार, फसवणूक करणाऱया अनिल परबांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिज़े
कारवाई करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव
अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासंबधी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली होत़ी यावेळी पोलिसांकडून परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आह़े यावरून पोलिसांवर राजकीय दबाव काम करत असल्याचे दिसून येत आह़े असा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केल़ा
तर अनिल परबांच्या भूतावर गुन्हा दाखल करा
अनिल परब हे रिसॉर्टचे अवैध बांधकाम आपण केले नाही असे सांगत आहेत़ मात्र कुणी तरी सीआझेडचे उल्लंघन करून बांधकाम केले आह़े अनिल परब यांनी हे बांधकाम केले नसेल तर अनिल परब यांच्या भूताने ते केले असाव़े त्यामुळे अनिल परब यांच्या भूतावर गुन्हा दाखल करण्यात कराव़ा मात्र याप्रकरणी कुणाला तरी जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी सोमय्या यांनी केल़ी
सरकार तुमचे मग पत्रकार परिषद का घेता
संजय राऊत हे शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत़ यामध्ये ते साडेतीन लोकांना अनिल देशममुखांच्या कोठडीत पाठविणार असल्याचे सांगतात़ सरकार तुमचेच आहे तर पत्रकार परिषद कशाला घेत़ा कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुहुर्त शोधत आहेत हा असा टोला सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत लगावल़ा
आदित्य ठाकरे यांनी नाटक बंद करावी
आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या टिकेसंदर्भात सोमय्या म्हणाले की, कोरोना काळात कोविड सेंटरचा ठेका ब्लॅकलिस्ट असलेल्या कंपनीला देण्यात आला होत़ा यामध्ये मोठा भ्रष्टाचार ठाकरे सरकारकडून करण्यात आला आह़े त्यामुळे आदित्य ठाकरेंनी नाटक बंद करून कारवाई करावी असा प्रहार सोमय्या यांनी यावेळी केल़ा
…