ऑनलाईन टीम
राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनायल (ईडी)ने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. तसेच कायदेशील लढाई आता कायद्याने लढणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी यापूर्वीच एक ट्वीट करून लवकरच अनिल परब यांना ईडीची नोटीस दिली जाणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आज ईडीने मंत्री अनिल परब यांना नोटीस पाठवल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
भाजपने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप होत आहे. या नोटीशीच्या माध्यमातून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र शिवसेना डगमगणार नाही, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.