प्रतिनिधी /पणजी
अखिल गोवा भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष, भाजप राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आणि समाजसेवक अनिल होबळे यांना ’यंग नेच्युरलिस्ट अवार्ड- दक्षिण आशिया’ या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी यंग नेच्युरलिस्ट नेटवर्क संस्थेचे सहसचिव राजेंद्र जाधव, सरचिटणीस डॉ. अमित दत्ता, राजस्थानमधील लोढा फाऊंडेशनच्या संचालक तथा प्रसिद्ध साहित्यिक व समाजसेविका मंजू लोढा आदींची उपस्थिती होती.
व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱयांचा या संस्थेतर्फे सन्मान करण्यात येतो. श्री. होबळे हे गत सुमारे 40 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत अन्य अनेकांनाही सन्मानित करण्यात आले.