अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
जैन समाज व जैन धर्माच्या विरोधात चुकीच्या अफवा राजस्थानमधील अनुप मंडल ही संस्था पसरवत आहे. तेंव्हा या संस्थेवर कारवाई करावी. याचबरोबर देशव्यापी बंदी घालावी, या मागणीसाठी येथील अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्यावतीने पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
अनुम मंडल ही संस्था विनाकारण कोणत्याही पुराव्याविना जैन साधू, साधवी व समाजाबाबत अपप्रचार करत आहे. जैन व हिंदू धर्माचा अपप्रचार करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजस्थान सरकारने यापूर्वीच या संस्थेवर बंदी घातली आहे. तरी देखील सोशल माध्यमावरून जैन धर्माचा अपप्रचार सुरू केला. वेगवेगळय़ा प्रकारचे व्हिडिओ पाठवून बदनामी सुरू केली आहे. तेंव्हा त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भरतेश एज्युकेशन ट्रस्ट, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री चंद्रप्रभू मूर्ती पूजक संघाच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भरत पाटील, प्रमोद पाटील, उत्तम पोरवाल, राजू दोड्डण्णावर, राजेंद्र जैन, अंकित खोडा, विजय पाटील, विक्रम जैन, राजू खोडा, हर्षवर्धन इंचल, अभिजित भोजण्णावर, अमित शाह, हिराचंद कलमनी, कुंतीनाथ कलमनी, अभय अवलक्की यांच्यासह जैन समाजातील नागरिक उपस्थित होते.