भाई सावंत यांच्या पुढाकाराने भरीव मदत : जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्य, आर्थिक मदत
वार्ताहर / बागायत:
पोईप येथील कातकरी वसाहतीतील जळीतग्रस्त तिन्ही कुटुंबियांना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद उर्फ भाई सावंत यांनी जीवनाश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक स्वरुपात भरीव मदत सुपुर्द केली. वसाहतीतील अन्य कातकरी कुटुंबियांनाही जीवनाश्यक साहित्याचे वाटप केले. संकटसमयी अवघ्या काही दिवसांतच झालेल्या या मदतकार्यामुळे जळीतग्रस्त कातकरी कुटुंबियांना मोठा आधार मिळाला. सर्व कातकरी कुटुंबिय सुखावून गेले.
21 नोव्हेंबर रोजी दुपारी पोईप येथील कातकरी वसाहतीतील प्रकाश सीताराम पवार, सुरेश प्रकाश पवार आणि दिलीप किसन वाघमारे या तिघांच्या झोपडय़ांना भीषण आग लागून पूर्णतः नुकसान झाले होते. झोपडय़ांमधील जीवनोपयोगी साहित्य, महत्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कातकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. या संबंधीचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच भाई सावंत यांनी तिन्ही कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच इतर दानशूर व्यक्तींनाही मदतीसाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला जिल्हाभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला.
शनिवारी भाई सावंत यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पोईप येथील कातकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. नंतर संसारोपयोगी साहित्य तसेच आर्थिक मदतीचे वितरण केले. जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्राr, आनंद बांबर्डेकर, परब अणाव, भवानी मित्रमंडळ, ओरोस तसेच कट्टा पंचक्रोशीतील कट्टय़ाचे माजी सरपंच सतीश वाईरकर, पत्रकार विशाल वाईरकर, उपसरपंच, मकरंद सावंत, तुषार सकपाळ, प्रितम पिंटू खटावकर, विनीत भोजने, मंदार मठकर, अक्षय गावडे, आकाश गावडे, वैभव कवठणकर यांनीही मोलाची सामग्री उपलब्ध करून दिली. हे सर्व साहित्य जिल्हय़ातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.
यावेळी ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, जि. प. माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संदीप मेस्त्राr, दादा साईल, बाबा परब, जगदिश चव्हाण, विक्रांत नाईक, मकरंद सावंत, बापू पाताडे, चिराग बांदेकर, बबन सावंत, व्हिक्टर फर्नांडिस, अजित भोगले, शुभम राठिवडेकर, अमोघ नेवगी, पप्पू पुजारे, गणेश तळगावकर, नितीन पाडावे, मंदार पडवळ, नितीन चव्हाण, सुमित सावंत, हरिश गावकर, आनंद दुखंडे, नितीन चव्हाण, विरेश धारपवार, कुणाल चव्हाण, प्रवीण सावंत, मंदार गोसावी, जॉनी फर्नांडिस आदी उपस्थित होते.
‘त्या’ शिक्षिकेचा गौरव
कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणाची गैरसोय दूर करणाऱया व त्या मुलांमध्ये शैक्षणिक प्रगती घडविणाऱया रंजना भाटकर यांचाही सन्मान करण्यात आला. भाषा वेगळी असूनही विशेष मेहनत घेऊन भाटकर ताई त्या मुलांसाठी शिक्षण देत असतात. त्यांनाही आर्थिक मदत करून त्यांच्या कार्याचा गौरव भाई सावंत यांनी केला.