प्रतिनिधी /रत्नागिरी :
मिऱया येथे गेले 20 दिवस अडकून पडलेल्या एम टी बसरा स्टार या जहाजावरील ऍाईल काढण्याला सुरुवात झाली आह़े गुरुवार दुपार पर्यंत 30 बॅरल ऍाईल काढण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांनी दिल़ी
ते म्हणाले की, जहाजाच्या मागील जहाजाच्या मागील बाजूला असलेल्या इंजिन विभागाला लाटांच्या तडाख्याने गंभीर नुकसान झाले आह़े इंजिन विभा ामधील ऑईल गळती झाल्यास परीसरातील पर्यावरणाला धोका उत्पन्न होउ नये म्हणून ऍाईल काढण्याला प्राधान्य राहणार आह़े त्यानुसार बुधवारी 24 रोजी सायंकाळी उशीरा 5 बॅरल व गुरुवारी दुपारपर्यंत 25 बॅरल ऑईल काढण्यात यश आले आह़े जहाजातील ऑईल संपूर्णपणे काढल्यानंतर डिझेल काढण्यास युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येणार आह़े डिझेल काढण्यास निसर्गाने साथ दिल्यास दोन ते तीन दिवसामध्ये जहाज रीकामे करण्यात यश येईल, संपूर्ण जहाज रिकामे झाल्यावर जहाजदेखील हलवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत़
अजस्त्र लाटा व वेगवान वाऱयामुळे डिझेल काढण्याला गेले काही दिवस अपयश येत होत़े मात्र लाटांच्या माऱयामुळे जहाज दगडावर आपटून इंजिन विभागाला मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे लक्षात येताच डिझेल काढण्याचे थांबवून इंजिन विभागातील ऑईल काढण्यास प्राधान्य देण्यात आले आह़े संध्याकाळी नंतर समुद्र शांत झाल्यानंतरच जहाजावरील ऑईल काढण्याला सुरुवात करण्यात येत आह़े प्रतिकुल वातावरणामुळे गेले काही दिवस तंत्रज्ञ सुध्दा हतबल झाले होत़े गुरुवारी संध्याकाळपर्यंत जहाजावरील संपूर्ण डिझेल काढण्याची प्रयत्न असणारा आहे स़ध्य स्थितीमध्ये जहाजावरील डिझेल सुरक्षित असल्याचे महानवर यांनी सांगितल़े