ऑनलाईन टीम / काबुल :
पुलित्झर पुरस्कार मिळवणारे भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतात हत्या करण्यात आली. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंडजे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
ममुंडजे म्हणाले, अफगाण विशेष दलांनी एका पोलिसाला वाचवण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचे सिद्दीकी यांनी रिपोर्टिंग केले होते. तेव्हापासून ते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. गुरुवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली.