मुंबई : अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केलेले अभिनेते दिनकर गावंडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चमेली, कथा दोन गणपतरावांची, शेगावचा राणा गजानन, डोंबिवली फास्ट, कलकत्ता मेल, गांधी माय फादर, सत्यबोल अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लहान पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच नटसम्राट, अग्निपंख, अखेर तुझ्यासाठी, किरवंत, चाणक्य विष्णूगुप्त या नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला होता.
Previous Article‘ब्रेक्झिट’वर अखेर समझोता
Next Article न्यायालयाच्या आदेशानुसार ‘ईडब्ल्यूएस’चे आरक्षण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.