महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त अभियंते अशा नावाची निवृत्त अधिकाऱयांच्या संघटनेची कर्नाटक राज्यात स्थापना केली आहे.
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रात पंचवार्षिक योजनेंतर्गत विविध प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली. मात्र या कामांकरीता त्याकाळी अभियंत्यांची महाराष्ट्राला कमतरता भासू लागली. या काळात महाराष्ट्रात अभियांत्रिकीची विद्यालये कमी असल्याने अभियंते हवे तेवढे उपलब्ध होत नव्हते. त्यामानाने कर्नाटक राज्याची स्थिती अगदी उलट होती. म्हणजे येथे अभियांत्रिकीची विद्यालये जास्त व येथे अभियंत्यांची संख्याही मोठी होती. पण येथे प्रकल्पाची कामे फार कमी होती. त्यामुळे येथे अनेक शिकून तयार असलेले अभियंते बेरोजगार होते.
त्याकाळात महाराष्ट्राने येथील अनेक बरोजगार अभियंत्यांना विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रकल्पावर सामावून घेवून कायमचा रोजगार देऊन यांची बेरोजगारी दूर केली. कर्नाटक राज्याच्या हद्दीतील हजारो अभियंत्यांच्या हाताला काम देऊन महाराष्ट्र राज्याचा विकास करण्याची संधी यांना मिळाली. त्यामुळे येथील अभियंत्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कौटुंबिक स्थितीत सुधारणा झाली. व यांची मुलेही उच्च शिक्षण घेवू लागली.
अशा या त्या काळच्या अभियंत्यांनी आता महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त अभियंते अशा नावाची निवृत्त अधिकाऱयांच्या संघटनेची कर्नाटक राज्यात स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून गेली 10 ते 12 वर्षे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर संघटना सभासदांची नोकरी, पेन्शन विषयक येणाऱया अडचणी दूर केल्या. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या संघटनेच्यावतीने प्रतिवषी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.
आतापर्यंत या संघटनेची 10 संमेलने झाली असून 10 वे स्नेहसंमेलन बेळगाव येथील विद्याधिराज सभागृहात नुकतेच मोठय़ा उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष एस. सुब्रमण्यम, एस. एस. खनगावी, आर. एम. दोडमनी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मधुरा गावडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे उपाध्यक्ष आर. एम. दोडमनी यांनी प्रास्ताविक केले. आणि सभासदांना मिळणाऱया निवृत्ती वेतनाविषयी व सभासदांच्या निधनानंतर मिळणाऱया वेतनामध्ये येणाऱया अडचणी संघटनेच्यावतीने सोडविण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर बेळगाव संघटनेचे अध्यक्ष एस. एस. पाटील, भरत गावडे, के. व्ही. होनुगार, डी. एस. हिरोजी यांनी मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात गायन, नृत्य, अभिनय आदी सांस्कृतीक कार्यक्रम पार पडले. यावेळी निवृत्त अभियंते आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते.
संदीप एम. मुतगेकर