अमेरिकेत मागील आठवडय़ात प्रतिदिन सरासरी 70 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱया रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. याचबरोबर मृतांचा आकडाही मागील आठवडय़ात 5,600 ने वाढला आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात संक्रमण वाढण्यावरून भ्रम पसरविला जात असल्याचा दावा केला होता. यामागे एखादा कट असावा, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु व्हाइट हाउसचे टेस्टिंग प्रभारी ब्रेट गिरियोर यांनी अध्यक्षांचे विधान फेटाळले आहे. रुग्ण वाढत आहेत हे सत्य आहे. याचा पुरावा रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱया रुग्णांची संख्याही वाढतेय हा असल्याचे गिरियोर यांनी म्हटले आहे.
मास्कच्या वापरास टाळटाळ
महामारी फैलावत असूनही अमेरिकेच्या बहुतांश हिस्स्यांमध्ये मास्क वापरण्यास लोक टाळाटाळ करत आहेत. ग्रोसरी स्टोअर, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये पाहिल्यास लोक मास्कशिवाय दिसून येतील, असे व्हाइट हाउसच्या कोरोनासंबंधीच्या कृतिदलाचे समन्वयक डेब्रॉह ब्रिक्स यांनीच म्हटले आहे.