वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
22 ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱया आयर्लंडविरूद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकांसाठी अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व भारतीय वंशाच्या मोनांक पटेलकडे सोपविण्यात आले आहे. मोनांक पटेल आता अमेरिकेच्या टी-20 व वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून राहील, अशी माहिती अमेरिकेच्या क्रिकेट संघटनेने दिली आहे.
आयर्लंडविरूद्ध होणाऱया आगामी मालिकांसाठी अमेरिकेचे वनडे आणि टी-20 संघ घोषित करण्यात आले आहेत. ऍरॉन जोन्सकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमेरिकेच्या वनडे संघामध्ये भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंचा समावेश असून त्यामध्ये सौरभ नेत्रावलकर, निसर्ग पटेल, जे. मल्होत्रा, राहुल जरीवाला, सुशांत मोदानी, गजानंद सिंग, वत्सल वाघेला यांचा समावेश आहे.