वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2020 च्या एफ-वन मोटार रेसिंग ग्रा प्रि हंगामातील अमेरिकेत होणाऱया चार शर्यती कोरोना महामारी संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजिकांनी शुक्रवारी घेतला.
एफ-वन ग्रा प्रि मोटार रेसिंग 2020 हंगामातील वेळापत्रक कोरोनामुळे पूर्ण कोलमडले आहे. एफ-वन रेसिंग क्षेत्रातील युरोपियन फेरीतील तीन शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमोला आणि न्यूरबरग्रिंग येथील स्पर्धा यावर्षी घेतल्या जाणार नाहीत. एफ-वन रेसिंग फेडरेशनने कोरोना महामारीमुळे यापूर्वीच कॅनडा, टेक्सास, मेक्सिको आणि ब्राझील येथील शर्यती रद्द केल्या आहेत. आता 2020 एफ-वन वेळापत्रकातील एकूण 11 शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. चीनमधील शाघांय येथील होणारी एफ-वन मोटार शर्यत रद्द केली जाण्याची अपेक्षा आहे.