वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅरिसमध्ये सुरु असलेल्या बॅच खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विजेता स्क्वॅशपटू वेलावन सेंथिलकुमारने हाँगकाँगच्या लिंगचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
जागतिक स्क्वॅशपटूंच्या मानांकनात 58 व्या स्थानावरील सेंथिलकुमारने या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत हाँगकाँगच्या अँडेस लिंगचा 11-2, 11-1, 11-36 अशा गेम्समध्ये केवळ 22 मिनिटात पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता सेंथिलकुमार आणि फ्रान्सचा स्केनीमॅनिको यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. सेंथिलकुमारने या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत झेकच्या जेकुब सोलनिकायचा 11-5, 11-6, 11-2 अशा गेम्समध्ये 37 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.