ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 1 लाख 61 हजार 568 रुग्ण आढळून आले. तर 1238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, अमेरिकेतील रुग्णसंख्या 1 कोटी 39 लाख 19 हजार 870 वर पोहचली आहे. त्यामधील 82 लाख 22 लाख 879 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 54 लाख 22 हजार 659 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 25 हजार 307 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 2 लाख 74 हजार 332 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 19 कोटी 49 लाख 08 हजार 749 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 12 लाख 67 हजार 486 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 22 हजार 057 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 12 लाख 34 हजार 232 जणांना बाधा झाली असून, 19 हजार 210 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 6 लाख 86 हजार 446 रुग्ण आढळून आले. त्यामधील 34 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.