बेंगळूर/प्रतिनिधी
देशात लवकरच कोरोना लसीचे वितरण केलेलं जाणार आहे. दरम्यान राज्यांना याबाबत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना लस सर्वप्रथम कोरोना योद्धयांना देण्यात येणार आहे. दरम्यान आतापर्यंत २,२४,०८३ शासकीय आणि २,४५,७७३ खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा कर्नाटकमधील लसीच्या प्राधान्य यादीत समावेश आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ३० हजार लसीकरण स्थळे, ६८३१७ सरकारी आणि ३५,३१२० संभाव्य खाजगी लसीकरण करणारे कर्मचारी आहेत.
सोमवारपर्यंत, ६८,३१७ सरकारी आणि ३५,३१० खासगी संभाव्य लसीकरण करणाऱ्यांची नावं तयार आहेत. बृह बेंगळूर महानगर पालीके (बीबीएमपी) ने कोविड लसीसाठी साठवण सुविधा उपलब्ध करून दिली असून बेंगळूरमध्ये यासाठी दोन केंद्रे निश्चित केली आहेत. बीबीएमपीने इंदिरानगरमधील टाऊन हॉल जवळील दसाप्पा हॉस्पिटल आणि इंदिरानगरमधील बेंगळूर अर्बन जिल्हा आरसीएच कार्यालय निश्चित केले आहे.
बीबीएमपीने अंगणवाडी सेविका आणि खासगी व सरकारी रूग्णालयातील कर्मचार्यांप्रमाणे ९८ हजार आघाडीच्या कामगारांना प्रथम लस दिली जाईल. बीबीएमपी १४१ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८ प्रसूती रुग्णालये, ६ रेफरल रुग्णालयांव्यतिरिक्त शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांना या साठवण सुविधांमधून लस वितरण करणार आहे.
मंत्री सुधाकर यांच्या माहितीनुसार राज्यात लसीच्या साठवण आणि वितरणासाठी २,८५५ कोल्ड साखळी ठिकाणे स्थापन केली आहेत.