ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 31 लाख 43 हजार 197 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 3 लाख 85 हजार 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, अमेरिकेत सोमवारी 2 लाख 14 हजार 683 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 1964 जणांचा मृत्यू झाला. 2.31 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 36 लाख 80 हजार 461 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 90 लाख 77 हजार 487 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 28 हजार 826 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. येथे 11 लाख 82 हजार 351 रुग्ण आढळून आले. त्यामधील 39 हजार 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.