बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात पहिल्या टप्प्यात कोविड लसच्या ७.९५ लाख कुपी मिळणार असून ती आनंदराव सर्कलजवळील सरकारी साठवण सुविधेत साठवली जाईल, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मंगळवारी सांगितले.
“कोवि-शील्ड लसीला डीसीजीआय (ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया) ची आधीपासूनच मंजूर मिळाली आहे. केंद्र सरकारने २१० रुपये प्रति दराने लस १.१ कोटी डोस विकत घेतले आहेत. ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे, अशी माहिती सुधाकर यांनी दिली. पुणे सीरम संस्था २३१ कोटी खर्च करून लस पुरवतो आणि कर्नाटकात पहिल्या टप्प्यात कोवी-शील्डच्या ७.९५ लाख कुपी मिळतील.
लसच्या प्रत्येक डोसमध्ये ०.५ मिली आणि प्रत्येक कुपीमध्ये १० डोस लस असतात. पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला पाहिजे. लस शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करेल आणि ती सुरक्षित आहे., अशी माहिती तिन्ही दिली आहे.
मंत्री यांनी गैरवापर होऊ नये म्हणून कुपीवर ‘विक्रीसाठी नाही’ असे लिहिले जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस प्राधान्याने मिळेल. लस देताना सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील. लसीकरणानंतर प्रत्येक व्यक्तीला लसीकरणानंतर ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवले जाईल, असे सुधाकर यांनी स्पष्ट केले.