कोलोराडोमध्ये युवकाकडून पार्टीमध्ये बेछूट गोळीबार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या कोलोराडो प्रांतातील कँटरबरी मोबाइल होम पार्कमध्ये रविवारी एका वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचलेल्या युवकाने बेछूट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश आहे. गोळीबारादरम्यान आरोपीने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.
वाढदिवसाची पार्टी हल्लेखोराच्या प्रेयसीच्या घरात सुरू होती. या हल्ल्यात त्याच्या प्रेयसीचाही मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पेहोचलेल्या पोलिसांना तेथे 6 जणांचे मृतदेह सापडले होते. तर गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत मागील 4 दिवसांमध्ये गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 8 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेयर येथे दोन गटांमधील भांडणानंतर गोळीबार झाला होता. तर 6 मे रोजी इडाहो येथील एका शाळेत एका मुलीने गोळीबार केला होता. या घटनेत 2 मुलांसह 3 जण जखमी झाले हेते. शिक्षकाने मुलीच्या हातातून बंदूक काढून घेतली होती.