ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 75 लाख 19 हजार 636 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 73 हजार 528 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शनिवारी 1 लाख 05 हजार 983 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 2730 जणांचा मृत्यू झाला. 02.75 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 72 लाख 68 हजार 517 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 97 लाख 77 हजार 591 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 22 हजार 406 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 32 कोटी 23 लाख 95 हजार 403 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 33 लाख 93 हजार 554 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 43 हजार 938 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 24 लाख 93 हजार 131 जणांना बाधा झाली असून, 39 हजार 470 रुग्ण दगावले आहेत.