प्रतिनिधी / सांगली
सांगली शहर युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. नुतन पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, विशाल पाटील, डॉ. जितेश कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुहेल बलबंड, बिपीन कदम, कय्युम पटवेगार, अमर निंबाळकर, अमित पारेकर, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी मंत्री विश्वजीत कदम यांनी युवकांना केंद्र सरकारच्या बेजबाबदार कारभारा विरोधात सर्वसामान्य जनतेसाठी लढा उभा करा तसेच काँग्रेस पक्ष तळागळात पोहचवा असे आवाहन केले.
नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे : संग्राम गिरी- कार्याध्यक्ष अमित उजगरे- उपाध्यक्ष अरबाज शेख- उपाध्यक्ष शैलेश शेजाळ- सरचिटणीस जावेद मुल्ला- सरचिटणीस संजय कुलकर्णी- महासचिव मोहमद शेख- महासचिव हिरा कांबळे- चिटणीस स्वप्नील उंटवाले- समन्वयक, सोशल मिडिया |