ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 73 लाख 61 हजार 611 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 46 लाख 09 हजार 636 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत सोमवारी 37 हजार 418 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 355 जणांचा मृत्यू झाला आहे. 73.61 लाख कोरोना रूग्णांपैकी 25 लाख 42 हजार 167 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 065 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 2 लाख 9 हजार 808 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 कोटी 54 लाख 01 हजार 706 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 13 हजार 257 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 15 हजार 169 रुग्ण बरे झाले आहेत. टेक्सासमध्ये 7 लाख 77 हजार 165 जणांना बाधा झाली असून, 6 लाख 75 हजार 753 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.