प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मंगळवारी पणजीत निवडणुकीपूर्वी आपच्या पहिल्या जाहीरसभेला संबोधित करणार आहेत.
केजरीवाल आज राज्यात दाखल होत असून त्यांच्या दोन दिवसीय दौऱयात ते सर्वप्रथम मंगळवारी 4 वा. भाऊसाहेब बांदोडकर मैदान, कांपाल येथे महासभेला संबोधित करतील.
शनिवारी दिल्लीचे आप आमदार आणि आप गोवा डेस्क प्रभारी आतिशी यांनी पणजीमध्ये जाहीर सभा घेण्यास सरकारने जाणीवपूर्वक विलंब केल्याबद्दल राज्य सरकारवर तोफ डागली होती. पक्षाने पाच दिवसांपूर्वी परवानगीसाठी अर्ज केला होता आणि तो अर्ज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले होते. शेवटी केजरीवाल आज संबोधित करणाऱया रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. जाहीरसभेला मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.