विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गोवा भेटीवर आले असून ते फ्ब्रुवारी-मार्च 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठडय़ात गोव्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून तेंव्हापासून आचारसंहिता लागू होणार अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांच्या नेतृत्वाखालील हे पथक गोव्यातील राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. मतदारयादी उजळणी, मतदार जनजागृती याची माहिती हे पथक घेणार असून निवडणुकीशी संबंधित विविध खाते प्रमुखांशी सदर पथक बोलणी करणार आहे. या पथकामध्ये तीन जणांचा समावेश असून निवडणूक होईपर्यंत विविध पथकातून गोवा दौरा करणार आहेत.
सुरक्षेच्यादृष्टीने साधणार संवाद
मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालक, महानिरीक्षक यांच्याशी सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक संवाद साधणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱया दोन्ही जिल्हाधिकाऱयांना देखील ते पथक भेटणार आहे. आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल सदर पथक घेणार असून निवडणूक तयारीचा एकंदरीत अहवाल आयोगाला सादर करणार आहेत.
गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणीपूर या पाच राज्यांच्या निवडणुका फ्sढबुवारी-मार्च महिन्यात व्हायच्या असून त्याच्या एकंदरीत तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे पथक वरील सर्व राज्यांच दौरा करीत आहे. सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर आणि एकंदरीत तयारीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथक गोव्यातून निवडणूकीपूर्वी प्रसारमाध्यमांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.