प. पू. ब्रह्मेशानंद स्वामींसोबत पूजेत सहभाग
प्रतिनिधी /पणजी
गोवा भेटीवर आलेले आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थानिक नेत्यांसह कुंडई तपोभूमीवर श्रीदत्त पद्मनाभ पीठाला भेट देऊन पीठाधीश्वर सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी यांच्यासमवेत पूजा केली.
श्री. केजरीवाल हे एका दिवसाच्या दौऱयावर गोव्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्यांचे आगमन झाले. नंतर आप नेत्यांसह त्यांनी तपोभूमीवर श्रीदर्शन घेतले.
तपोभूमीच्या भेटीदरम्यान पीठाधीश ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केजरीवाल यांना पारंपरिक समई भेट देऊन गौरव केला. तसेच पद्मनाभ संप्रदाय आणि तपोभूमीचा इतिहासही विषद केला. त्याचबरोबर तपोभूमीवर लोकांना वेद आणि संस्कृत भाषेचे ज्ञान कसे सुलभ करते यावर ब्रह्मेशानंद स्वामींनी त्यांना माहिती दिली.