प्रतिनिधी /बेळगाव
सोमनाथ बिल्डर ऍण्ड डेव्हलपर्सचे मालक अरुण चौगुले यांचा वाढदिवस शांताई वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. त्यांनी वाढदिवसानिमित्त आश्रमाला देणगी दिली.
याप्रसंगी आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे, नगरसेवक रवी साळुंखे, सुमंत जाधव, आनंद टपाले, विनायक मोरे, जयदीप भोसले उपस्थित होते. मंगेश यांच्या आईच्या हस्ते आश्रमाला धनादेश देण्यात आला.