वाठार किरोली / प्रतिनिधी :
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अपशिंगे ता. कोरेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू नारायण कदम (वय ६५, रा. अपशिंगे ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विष्णू कदम याने 13 जून रोजी दुपारी 12 वाजता फिर्यादी महिलेच्या घरात घुसून, त्यांच्या अल्पवयीन मुलीस जवळ घेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर संशयित आरोपीवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास स.पो. नि. गणेश कड यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक फौजदार सावंत करीत आहेत.