प्रतिनिधी/ सातारा
गेल्या सहा दिवसांपासून दुपारी नियमित पाऊस जिह्यात कुठे ना कुठे हजेरी लावत आहे. शनिवारीही हवामान खात्याने दुपारी अति पावसाचा इशारा दिला होता. रविवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील अचानक वातावरणात बदल झाला. मेघगर्जना करत विजांच्या लखलखाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटाने तर शहरातील रस्ते निमर्नुष्य झाले. दुपारी साडेचार वाजता अक्षरशः रात्रीचा फिल आला होता. त्यामुळे शहरवासिय भितीने घाबरले होते. शाहुपूरीतील पुष्पयश अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील भ्ंिांतीवर वीज कोसळ्ल्याने झालेल्या आवाजाने त्या अपार्टमेंटमध्ये सगळेच भयकंपित झाले होते.
शहरात कोरोनाच्या धास्तीने सगळेच घरात आहेत. उकाडय़ाने हैराण करणाऱया वातावरणात कसेबसे दिवस घालवत असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास मेघगर्जना सुरु झाली. विजांचा लखलखाट सुरु झाला. जोरात अचानक पावसाने सुरुवात केली. काळवंडून आल्याने अक्षरशः साताऱयात रात्रीचा फिल आला होता. s वामकुशी घेत असलेल्यांच्या ढगाच्या गड ते मात्र उठले अन् भितीने चांगलेच गांगरले. काही सातारकरांनी मात्र या पावसाचा आनंद घेतला. बाहेर रस्त्यावर पडत असलेल्या पावसाची मनमोहक अशी दृश्य नजरेत साठवली. शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले. सखल भागात पाणी साठले. महावितरण कंपनीने या सुरु असलेल्या पावसामुळे कुठे तारा तुटून नुकसान होवू नये म्हणून विद्युत पुरवठा खंडीत केला होता. एकदोन ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या असून बॅनरही फाटले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेष असे शहरात कोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शाहुपूरीतील पुष्पयश या अपार्टमेंटमध्ये या पावसामध्ये चौथ्या मजल्यावरील टेरेसवरील भिंतीवर वीज कोसळली. त्यामध्ये भिंतीचे नुकसान झाले असल्याचे दीपक जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या वीज पडल्याच्या घटनेने परिसरात घबराहट निर्माण झाली होती.
हॉस्पिटल बाहेरील बाधित अन् नातेवाईकांची तारांबळ
जिल्हय़ात दररोज अडीच हजाराच्या आसपास येणाऱया कोरोना बाधित यामुळे बेडची कमतरता भासू लागली आहे. बाधित व्यक्तीला घेऊन अनेक दवाखान्यांच्या पायऱया चढाव्या लागत आहेत. तसेच काहींच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर, ऑक्सीजनसाठी धावपळ सुरू आहे. अशातच शहरात दुपारी अवकाळी पावसाने सुरुवात झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ झाली. जम्बो व सिव्हील हॉस्पिटलच्या पायरीवर बाधितांच्या प्रवेशासाठी उभे राहिलेल्या बाधित व्यक्तेंसह नातेवाईकांना काय करायचे हे सूचत नव्हते. एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्स पाळणे अवघड झाले.
परळीत रस्त्याततच झाडे पडली
सातारा तालुक्यातील परळी येथे जाणाऱया रस्त्यावर झालेल्या पावसाने दोन ठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे परळीकडे गेलेल्या नागरिकांची वाटेतच अडवणूक झाली. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला याची माहिती देताच पडलेली झाडे हटवण्या आली.